पशु संवर्धन
विभाग प्रमुख | डॉ. विक्रम निराटले |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ९८१९५४४६४२ |
ई- मेल | animalhusbandary@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिका
पशुसंवर्धन विभाग
// कर्तव्यसूची //
- मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मोकाट कुत्र्यावर नियंत्रण करणेकरीता निविदा मागवून ठेकेदाराची नियुक्ती केली जाते. सदर ठेकेदाराकडून खालीलप्रमाणे कामकाज करण्यात येते
- मोकाट कुत्रे पकडणे (डॉग, व्हॅन व कर्मचारी ठेकेदारांचे असतात).
- पकडून सदरचे कुत्रे शस्त्राक्रिया ठिकाणी नेणे.
- प्रजनन शस्त्रक्रिया करणे व श्वान दंश लस नेणे.
- शस्त्राक्रिया केलेल्या कुत्र्यांना औषधोपचार व खानपान व्यवस्था करणे
- प्रजनन शस्त्रक्रिया झाल्यावर ज्या जागेवरून मोकाट कुत्री पकडली कुत्री त्याच जागेवर नेउन सोडणे.
- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मोकाट फिरणारी जनावरे महापालिका कामगारांकडून पकडून त्यांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यामध्ये बंदिस्त केले जाते. जर जनावरांचा मालक ७ दिवसांच्या आत जनावरे सोडविणेसाठी आला असता दंडाची रक्कम आकारुन जनावरे त्यांच्या ताब्यात दिली जातात. जर ७ दिवसांचे आत मालक जनावरे ताब्यात घेणेस न आल्यास शासनाची श्री मुबंई जीवदया मंडंळी, गोशाळा, वसई, ता-वसई, जि. पालघर या ठिकाणी जनावरे पाठविण्यात येते.
- महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग (नवि-२०) यांचे पत्र क्र. ०२००४/प्र.क्र.१२१/नवि/२०, दि.०७/०९/२००४ व महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग (नवि-२०) यांचे पत्र क्र. १०२००४/प्र.क्र.१२१/नवि/२०, दि.२२/०७/२००९ अन्वये जैन धर्मिंयांचे पर्युषण पर्व निमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची सुकाने बंद ठेवण्यास तसेच पर्युषण पर्वातील उर्वरीत दिवशी श्रावण वद्य १३ ते भाद्रपद शुध्द ३ व ५ या दोन दिवशी सर्व कत्तलखाने व मांसविक्रीच्या दुकानदारांना, कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद करणेबाबत महानगरपालिकेमार्फत आवाहान केले जाते.
- शासन आदेश क्र. संकीर्ण १०/२००२/प्र.क्र.१११/नवि. २७, नगरविकास विभाग, दि.२८/०३/२००३ अन्वये दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाते.
- शासन आदेश क्र. संकीर्ण १०/२००२/प्र.क्र.१११/नवि. २७, नगरविकास विभाग, दि.17/09/2002 अन्वये दरवर्षी “रामनवमी” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाते
- शासन (गृह विभाग) परिपत्रक क्र. : डिआयएस०९१३/प्र.क्र.४३४/विशा१(ब), दि.०१/१०/२०१४ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३३१ मधील तरतुदी अन्वये दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरी मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली जाते. बकरी ईदनिमित्त जनावरांची कत्तलपूर्व तपासणी करीता मा. जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त, ठाणे (कार्यालय – मुलुंड (प.)) या कार्यालयाकडून पशूधन विकास अधिकारी तथा सक्षम अधिकारी यांची नेमणूक केली जाते.
विभागाची कामे
पशुसंवर्धन विभागातील कामकाज ज्या अधिनियम/ नियम मधील तरतुदी अन्वये करण्यात येते, त्या तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील कलम ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९ अन्वये.
- प्राणी कलेश प्रतिबंधक कायदा १९६०.
- महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा (सुधारणा) कायदा, १९९५.
- प्राणी उत्पत्ती प्रतिबंधक कायदा २००१.
अधिकारी / कर्मचा-यांचे नाव | पदनाम | सोपविण्यात आलेले काम |
---|---|---|
श्री. संभाजी पानपट्टे | उप-आयुक्त पशुसंवर्धन |
|
डॉ. विक्रम निराटले | पशुवैदयकीय अधिकारी(ठोक मानधन) |
|
श्री. मनोज कुमरे | लिपिक |
|
श्री. किशोर पाटील | स.का. |
|
श्री. भरत गायकवाड | कोंडवाडा मुकादम |
|
श्री. पेरीनायगम आशिर्वादम | स.का. | |
श्री. तावडा नाटा | स.का. |
अंदाजपत्रक
सन २०१६ - १७ या मंजूर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पशुसंवर्धन विभागासाठी उपलब्ध तरतुदीचा तपशील खालीलप्रमाणे -
अनु. क्र. | लेखाशिर्षकाचे नाव | उपलब्ध तरतूद |
---|---|---|
१. |
ब) आरोग्य व सोयी – ३) लस टोचणी – ४) मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त / निर्बिजीकरण |
रु.४० लाख
|
२.
|
ब) आरोग्य व सोयी – ६) बाजारपेठा / कत्तलखाने आणि कोंडवाडे – २) जनावरांचे खाद्य |
रु.५०,०००/- |
शेवटचा बदल : 14-09-2021