मिरा भाईंदर महानगरपालिका
अंतर्गत लेखापरिक्षण

विभाग प्रमुख श्री.दिगविजय चव्हाण
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ०२२- २८१९२८२८  Ext- १४१ /  ९८३३५३७७८८
ई- मेल audit@mbmc.gov.in  

विभागाची कामे: 

  • म.न.पा.च्या कामकाजावरील आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे.
  • मनपाच्या सर्व विभागाच्या कामकाजाची पूर्वलेखापरीक्षा & पोस्ट लेखापरीक्षा करणे , आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे.

सर्व सेवा अ – बजेट

  • मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९५ नुसार वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाज मनपाचे आयुक्त यांनी दरवर्षी महापालिका विहित करेल अशा तारखेस किंवा तारखेपुर्वी मा.स्थायी समितीपुढे सादर करतात तत्पुर्वी उपरोक्त अधिनियमातील कलम ९५(ब) अन्वये पुढील सरकारी वर्षाच्या सुरुवातीस पुर्नविनियोजन करण्यासाठी किंवा खर्च करण्यासाठी उपलब्ध होतील अशा कोणत्याही शिल्लक रक्कमा असल्यास त्याबद्दलचे लेखापरिक्षण करुन अंदाज वर्तविण्याचे काम अंतर्गत लेखा परिक्षण विभागामार्फत केले जाते.
  • मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ९५(ड) अन्वये अंदाजपत्रकात पुढील सरकारी वर्षाकरिता आवश्यक व इष्ट असेल अशा कराधाना संबधीच्या प्रस्तावाचे विवरणपत्र व कराधानापासुन मिळणाऱ्या जमा रक्कमाचा अंदाज संबधीत विभागाकडुन घेवुन अंदाजपत्रकामध्ये तरतुद केली जाते.

सर्व सेवा ई - उत्पन्न समर्थन

  • बी.पी.एम.सी. कायदा १९४९ मधील प्रकरण ११ नगरपालिका कराधान यातील तरतुद अन्वये मनपाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी जे कर इष्ट आहेत अशा कराचा शोध घेवुन संबंधित विभागामार्फत कार्यवाही प्रस्तावित करणेबाबत अग्रेपीत केले जाते.
  • मनपाच्या कर विभागामार्फत काही वेळेला चुकीच्या कमी कर आकारणीची प्रकरणे सादर केली जातात अशा प्रकरणाची छाननी करुन नियमानुसार कर आकारणी करणेचे प्रस्तावित केले जाते त्यामुळे मनपाचे उत्पन्न वाढले जाते.
  • विविध विभागातील देयके तपासणी करीता मुलपे विभागात पाठविले जातात अशा बिलामध्ये काही अंशी दर जादा काढुन देयके प्रस्तावित केली जातात. अशा देयकांची योग्यप्रकारे तपासणी करुन जादा प्रदान केली रक्कम कमी करुन महसुल वाढविला जातो. कालबाहय झालेल्या करामध्ये  बी.पी.एम.सी.कायदा १९४९  च्या तरतुदीनुसार नविन कर सुचवुन उत्पन्नाच्या स्त्रोतमध्ये वाढ करण्याचे दृष्टीने विभागास सुचित केले जाते.
  • बी.पी.एम.सी. कायदा १९४९ चे कलम ९१ नुसार विशेष निधीची स्थापना करणोबाबतची तरतुद करण्यांत आलेली आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महापालिकेत (विशेष निधी) विशेष निधीची स्थापना करण्यात आलेली आहे.उदा. नगरसेवक निधी, प्रभाग समिती निधी क्र.१ ते ४, घसारा निधी कर्ज, निवारण निधी, निवृत्ती वेतन व उपदाने अशा प्रकारचे निधी स्थापन केलेले आहे. ज्याप्रयोजनार्थ निधीची स्थापना केली जाते त्या प्रयोजनार्थ निधीचा विनियोग करणेबाबतचे नियंत्रण लेखाविभागापरिक्षणमार्फत केले जाते.

पुन्हा निर्माण & भागीदारी – भव्य

  • मिरा भाईंदर महानगरपालिकेस केंद्रशासन व राज्यशासन मार्फत अनुदाने प्राप्त होत असतात. जसे दलित वस्ती अनुदान व गलिच्छ वस्ती अनुदान, निर्मल अभियान अनुदान, बी.एस.यु.पी. योजना, राजीव आवास योजना, वित्त आयोग अनुदान.
  • केंद्रशासन व राज्यशासन यांचेकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरवठा केला जातो. प्राप्त झालेल्या अनुदानाचा विनियोग व्यवस्थीतपणे करणेकरिता अंतर्गत लेखापरिक्षण विभागामार्फत नियंत्रण ठेवले जाते.

अधिकारी / कर्मचारी यांची पदनिहायक संख्या

अ . क्रं पदनिहायक कर्मचारी पदसंख्या
 १ मुख्य लेखापरिक्षक
 २ उप-मुख्यलेखापरिक्षक
 ३ सहा. लेखापरिक्षक
 ४ लिपीक
 ५ शिपाई
 ६ सफाई कामगार
 ७ संगणक चालक, अस्थायी 

अधिकारी /कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप

अ . क्रं पदनिहायक कर्मचारी माहिती
 १ श्री.दिगविजय चव्हाण
( मुख्य लेखापरिक्षक )
  • मुं. प्रां. मनपा अधिनियम १९४७ चे कलम -१०५ (१) च्या तरतुदीप्रमाणे महानगरपालिकेच्या लेख्यांची तपासणी व लेखापरिक्षण अहवाल मा.स्थायी समितीस सादर करणे.
  • महानगरपालिकेला येणे असलेल्या करासहित सर्व खर्चाची वसुली व महानगरपालिकेच्या निधीतुन खर्च झालेल्या खर्चाचे लेखापरिक्षण, आवश्यक प्रकरणी जागेवर प्रत्येक्षदर्शी भेटी देवुन कामाची तपासणी करणे , अनुसुची ‘ड’ प्रकरण ३ च्या नियम ५ नुसार विहित केलेली सर्व कर्तव्ये पार पाडणे.
  • मुं. प्रां. मनपा अधिनियम १९४९ नियम ४७ महानगरपालिकेच्या लेखापरिक्षेसंबंधी महानगरपालिकेकडून किंवा स्थायी सलमतीकडून व परिवहन निधीच्या लेखापरिक्षेसंबंधी परिवहन समितीकडून जी अन्य कर्तव्ये पार पाडणे.
  • स्थायी समिती व महानगरपालिकेच्या आदेशावरून लेखापरिक्षण करणे.
 २

१)  मंजिरि डिमेलो
( सहा.लेखापरिक्षक)

२) श्रीम. चारुलता खरपडे
( सहा.लेखापरिक्षक )
 

  • मनपाच्या सर्व विभागाचे दैनंदिन कामाचे लेखापरिक्षण करणे तसेच Post Audit व शासन पत्रव्यवहार इ .
 ३ श्रीम.सुनंदा भगत
लिपीक
  • मनपाच्या सर्व विभागाचे दैनंदिन काम पाहणे .आवक-जावक देयकांचे व प्रस्तावांचे संबंधितांना वाटप, पत्रव्यवहार मुलेप यांच्या निदर्शनास आणणे व वरिष्ठानी सांगितलेली कामे पाहणे.
 ४ १) श्री.नरेश निजाई
शिपाई
२) श्री.कुणाल म्हात्रे
शिपाई
  • मुख्यलेखापरिक्षण विभागातील वरिष्ठानी दिलेली कामे करणे तसेच इतर विभागातील प्रस्तावांचे रजिस्टर नोंदी करून घेऊन सर्व विभागांना त्या प्रस्तावांचे वाटप करणे. मुख्यलेखापरिक्षण कार्यालयातील दैनंदिन कामे करणे.
 ५ संगणक चालक
अस्थायी
  • संगणकाद्वारे विभागातील सर्व कामकाज पार पाडणे.

स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल

मिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक लेखा निधी लेखा परीक्षण अहवाल सन 2016-17 ते 17-18

लेखापरीक्षण अहवाल स्थानिक लेखा निधी सन २०१५-१६


लेखापरीक्षण अहवाल

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २०१४-२०१५

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २०१३-२०१४

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २०१२-२०१३

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २०१०-२०११

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २००९-२०१०

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २००८-२००९

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २००७-२००८

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २००६-२००७

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २००५-२००६

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २००४-२००५

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल २००३-२००४

लेखी परीक्षण अहवाल २००२/०३ ते २०१३/२०१४



आक्शेप ऑडिट विषय १३ - १४ ORIGINAL २०.०३. २०१७

वार्षिक जमा खर्च २०११-२०१२ 

Audit reports

 


शेवटचा बदल : 12-02-2021