मिरा भाईंदर महानगरपालिका
जन्म मृत्यू विभाग

विभाग प्रमुख  डॉप्रकाश जाधव
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक  28192828 / 28193028  विस्तार क्र. 275
ई- मेल bnd@mbmc.gov.in

मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या जन्म- मृत्यु विभागात वर्ष २ पासुन संगणकीय दाखले वितरीत केले जातात. सदर दाखले वितरीत करणे करिता सध्या दोन संगणकिय आज्ञावली कार्यरत आहेत. 

जानेवारी २०१६ पासुन झालेल्या जन्म व मृत्यु घटनांचे जन्म व मृत्यु दाखले ऑनलाईन उपलब्ध आहेत. दहन / दफन दाखले देण्याची व्यवस्था मुख्य कार्यालय येथे २४ तास व सुटटिच्या दिवशी उपलब्ध आहे.

प्रभाग क्र. _____ मिरा रोड येथुन कार्यालयीन वेळेत दहन/ दफन दाखले वितरीत केले जातात.  

जन्म मृत्यु विभागाची कार्यप्रणाली (विभागाची कामे)

मिरा भाईंदर महानगर पालिका, जन्म- मृत्यु विभागाचा शहरातील घड्लेल्या प्रत्येक जन्म व मृत्यु घटनेची नोंद त्वरीत घेण्याचा मानस असतो. सदर गोष्टी त्तत्परतेने घेणे करिता शासकिय व खाजगी इस्पितळांत होणा-या प्रत्येक जन्माची नोंद संगणकीय आज्ञावली द्वारे त्वरीत घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जन्म- मृत्यु नोंद २१ दिवसांच्या आत होणे करिता योग्य त्या सुचना सर्व इस्पितळ, क्लिनिक, यांना देण्यात आल्या आहेत.

जन्म दाखला नागरिकांना त्वरीत मिळणे करिता नागरि सुविधा केंद्र मुख्य कार्यालय भाईंदर (प) येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

जन्म दाखला प्राप्त करणे करिता लागणारी कार्यप्रणाली-

  1. जन्म दाखला विनंती अर्ज भरून देणे.
  2. घोषणा पत्राचा नमुना अर्ज भरुन देणे.
  3. आई/वडिलांचे आधार कार्ड इतर ओळख पत्राची छायांकीत प्रत देणे.
  4. 4) डिस्चार्ज कार्ड छायांकीत प्रत देणे.

मृत्यु दाखला प्राप्त करणे करिता लागणारी कार्यप्रणाली-

  1. मृत्यु दाखला विनंती अर्ज भरून देणे.
  2. मयत व्यक्तिच्या दहन दफन दाखल्याची छायांकीत प्रत जोड्णे.
  3. मयत व्यक्तिचा नमुना ४ अगर नमुना ४ अ याची छायांकीत प्रत जोडणे.
  4. तसेच मृत्यु दाखला प्राप्त करणे करिता आलेल्या व्यक्तिच्या ओळखपत्राची छायांकीत प्रत जोड्णे.

वरील दाखले प्राप्त करणे आधी जन्म व मृत्यु या घटनांची नोंद जन्म व मृत्यु अभिलेखात व संगणकात घेतली जाते.

सदर नोंदी ह्या जन्म- मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यु नोंद्णी नियम, २००० ची अंमलबजावणी नुसार घेतल्या जातात. तसेच मयत व्यक्तिला दहन / दफन करणे करिता दहन / दफन दाखला दिला जातो.

RTS अंतर्गत सेवा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५ अंतर्गत नागरीकांना द्यावयाच्या सेवा

अ . क्रं लोकासेवांची सुची आवश्यक कागदपत्र फी नियम कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
 १ जन्म प्रमाणपत्र विहीत नमुन्यातील अर्ज प्रति प्रत रु . १० ३ दिवस वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपायुक्त ( आरोग्य )
 २ मृत्यू प्रमाणपत्र विहीत नमुन्यातील अर्ज प्रति प्रत रु . १० ३ दिवस वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपायुक्त ( आरोग्य )

माहिती अधिकार अधिनियम

जन्म मृत्यू विभाग माहिती अधिकार अधिनियम

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ६० अन्वये मागितलेली माहिती

१३ पॉईंट


शेवटचा बदल : 17-09-2021