मिरा भाईंदर महानगरपालिका
अग्निशमन सेवा

विभाग प्रमुख श्री. प्रकाश बोराडे (मुख अग्निशमन अधिकारी )  
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 28041000 / 8422811204  
ई- मेल fire@mbmc.gov.in

कोणत्याही देशात संरक्षणाची चौथी फळी “अग्निशमन सेवा” असे मानण्यात येते. इतर तीन म्हणजे संरक्षण दलाची तीन दले आहेत. अग्निशमन सेवेचे महत्व फक्त युध्दाच्या वेळेसच नव्हे तर नेहमीच्या शांततेच्या वेळी सुध्दा सिध्द झालेले आहे आणि ते वाढते नागरी वस्तीचे क्षेत्र, कारखान्याचा विकास आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ते वाढत असते.

अग्निशमन सेवेचे कर्तव्य, फक्त आगीपासुन जीवन आणि मालमत्ता वाचविणे आणि त्यापासूनचा दुष्परिणाम कमीत  कमी करणे एवढेच नसुन बंद गटारे, विहीरी, उदवहन यंत्रे किंवा इतर यंत्रसामुग्री यात अडकून पडलेल्यांची आणि इतर (प्राणी मात्र यांची सुरक्षा), अडकलेल्यांची सुटका करणे हेही आहे. थोडक्यात, अडचणींच्या किंवा सत्व परिक्षा पाहणा-या प्रसंगात अग्निशमन सेवा, कर्मचा-यांचे धैर्य आणि खास सामुग्री हाताळण्याचे खास प्रशिक्षण यामुळे लोकांना सहाय्य करण्याकरिता उपयोगी पडते.

अग्निशमन सेवेचे कार्य सामान्यपणे, आगीपासून संरक्षण करणे, आगीचा प्रतिबंध करणे व सेवेचा परिणामकारकरित्या वापर करुन जिवित व वित्त हानी टाळणे हे असल्याने सर्व पातळीवर स्थिर, प्रबल, परिणामकारक आणि आदर्श संघटन असणे गरजेचे आहे.

अग्निशमन सेवेचे कार्यच अत्यावश्यक सेवेच्या स्वरुपाचे असल्याने अशा निकडीच्या प्रसंगीच्या सर्व हालचाली विभिन्न नियंत्रणाद्वारे पध्दतशीरपणे चालविण्याकरिता या संघटनेला उपयोगी पडणारे प्रभावी मदतीचे साधन म्हणजे संघटनेचे स्थायी आदेश.  या नियमपुस्तिकेत अग्निशमन दलाच्या प्रत्येक व्यक्तीने त्या त्या प्रसंगात कोणती कार्यपध्दती अनुसरावी या बाबतीत स्पष्ट कल्पना येण्याकरिता एक प्रमाणभुत कार्यपध्दती विहीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

अग्निशमन स्थानकाचे नांव व पत्ता :-

अ. क्र. अग्निशमन स्थानकाचे नांव व पत्ता दुरध्वनी क्र.
1 60 फिट रोड, नवरंग हॉटेल समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाईदर (प.) 28197637
28191001
28191002
2 सिल्वर पार्क, अग्निशमन केंद्र भाईदर (पू.) 28553661
3 उत्तन, भाईदर (प.) 28452002
4 नवघर गांव, शंकर नारायण कॉलेज समोर, पाण्याच्या टाकी जवळ भाईदर (पूर्व) 28192829
5 महेश्वरी भवन, भाईदर (प.) (प्रस्तावित)
6 कनकिया फायर स्टेशन, मिरारोड (पूर्व) (प्रस्तावित)

अधिकारी / कर्मचा-याचे नाव  व भ्रमणध्वनी क्र. :-

अ. क्र. अधिकारी / कर्मचा-याचे नाव हुद्दा भ्रमणध्वनी क्र.
1 श्री. प्रकाश बोराडे प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी 8422811204
2 श्री. दिलीप यशवंत रणवरे सब स्टेशन ऑफिसर 8422811202
3 श्री. छोटू सुवाजी आदिवाल सब स्टेशन ऑफिसर 8422811203
4 श्री. जगदिश पाटील सब स्टेशन ऑफिसर 8422811205
5 श्री. धनंजय वसंतराव कनोजे सब स्टेशन ऑफिसर 8433911108
6 श्री. अल्पेश जगन्नाथ संखे सब स्टेशन ऑफिसर 8422811400
7 श्री. डॉसेन ढोल्या सब स्टेशन ऑफीसर 8422811211
8 श्री. खेमराज भोजराज गहाणे सब स्टेशन ऑफीसर 8422811300
9 श्री. सदानंद पाटील सब स्टेशन ऑफीसर 8433911183
10 श्री. बापु इंदुलकर लिडींग फायरमन 8422811210

विभागाची कामे :- 

अ. क्र अधिकार पद प्रशासकीय अधिकार संबंधित कायदा/नियम/आदेश राजपत्र शेरा (असल्यास)
1 उप- आयुक्त
  1. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 ची अमंलबजावणी करणेबाबत कार्यवाही करणे.
  2. लोकसेवा हक्क अधिनियम 2016 नुसार विहीत मुदतीत कार्यवाही करणे.
  3. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अपिलीय अधिकारी म्हणुन कामकाज पाहणे.
  4. शासनाकडुन वेळोवेळी प्राप्त होणारे शासन निर्णयांची अंमलबजावणी करणे व त्याबाबत पुर्तता करुन घेणेबाबत कार्यवाही करणे.
  5. अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी आवश्यक सुचना देवून विभागाचे सक्षमीकरण करणे.
  6. मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी विभागाच्या सक्षमीकरणाकरीता सादर केलेल्या प्रकरणावर पर्यवेक्षक म्हणुन तापसणी करुन असे प्रस्ताव मा. आयुक्त सो व मा. महासभा यांच्या मंजुरीकरीता प्रस्तावीत करणे.
  7. अग्निशमन विभागाच्या सक्षमीकरणाकरीता वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
  8. आपतकालीन प्रसंगी अग्निशमन विभागाने केलेल्या कार्यवाहीच्या आढावा घेणे.
  9. अग्निशमन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नाहरकत दाखल्याच्या प्रस्तावावर पर्यवेक्षक म्हणुन कामकाज पाहणे.
  10. पर्यवेक्षक म्हणुन अग्निशमन दल प्रमुख या नात्याने मिरा भाईदर महानगरपालिकेचे अग्निशमन दल कायम कार्यक्षम स्थितीत ठेवणे.
  11. हाताखालील अधिकाऱ्यांना कामाचे वाटप करणे.
   
2 मुख्य अग्निशमन अधिकारी
  1. लोकसेवा हक्क अधिनियम 2016 नुसार विहित मुदतीत कार्यवाही करणे.
  2. अग्निशमन दल प्रमुख या नात्याने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दल कायम कार्यक्षम स्थितीत ठेवणे.
  3. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमातील मुख्य अग्निशमन अधिका-याला असलेल्या वेगवेगळया कलमाखालील अधिकारांचा वापर करणे.
  4. “अग्निशमन” विषयासंबंधीची अद्यावत माहिती घेवून आवश्यकतेप्रमाणे महानगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करणे.
  5. उप-मुख्य अग्निशमन अधिका-याला अग्निशमन केंद्राच्या वार्षिक तपासणीचा कार्यक्रम ठरवून देणे. (हा कार्यक्रम दरवर्षी मार्च महिन्यात निश्चित तयार करण्यात येईल व तो पुढील आर्थिक वर्षासाठी असेल).
  6. उप-मुख्य अग्निशमन अधिका-यांनी अग्निशमन केंद्राच्या केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या उणीवा दूर करण्यासंबंधीच्या अनुपालनाची तपासणी करणे.
  7. हाताखालील अधिका-यांना कामाचे वाटप करणे.
  8. मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांमध्ये आगीच्या धोक्याबद्दल जागरुकता निर्माण करणे.
  9. महानगरपालिकेव्यतिरिक्त, इतर शासकिय स्वायत्त वा खाजगी संस्थेच्या अग्निशमन दलाशी संबंधीत कामांच्या सभांसाठी /परिसंवादासाठी आयुक्त मिरा-भाईदर महानगरपालिका यांचे परवानगीने स्वत: हजर राहणे किंवा हाताखालील अधिका-यांना हजर राहण्यास सांगणे किंवा अशा समित्यांचे सदस्यत्व स्विकारणे.
  10. आयुक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी वेळोवेळी सोपविलेली आपात्कालीन व अत्यावश्यक तसेच इतर सर्व कामे.
  11. मिरा-भाईंदर क्षेत्राबाहेर सेवा पुरवायची असल्यास परिस्थिती नुसार निर्णय घेणे.
  12. महाराष्ट्र शासनामार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येणारे अधिकार.
  13. अग्निशमन विभागाच्या सक्षमिकरणाकरीता अदयावत वाहने यंत्रसामुग्री व साधन सामुग्री याबाबत माहिती गोळा करुन त्यांच्या खरेदी करीता प्रस्ताव तयार करणे.
  14. अग्निशमन नाहरकत दाखल्यांकरिता प्राप्त होणाऱ्या प्रस्तांवावर स्थळ पाहणी करुन उप-आयुक्त अग्निशमन यांचेकडे प्रस्ताव सादर करणे व प्रस्ताव मंजुरी नंतर मंजुर दराने फि आकारुन दाखले प्रदान करणे बाबत कार्यवाही करणे.
  15. शासनाकडुन प्राप्त होणाऱ्या शासन निर्णय परिपत्रक इत्यादींची अमंलबजावणी करणे व आवश्यक असल्यास त्याबाबत प्रस्ताव सादर करणे.
  16. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 ची अमंलबजावणी करणेबाबत कार्यवाही करणे.
  17. अग्निशमन विभागाच्या सक्षमिकरणाकरीता संभाव्य खर्चाचे व उत्पन्नांचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करुन आर्थिक वर्षात तरतुद करण्याकरीता प्रस्ताव तयार करणे.
  18. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत जन माहिती अधिकारी म्हणुन कामकाज पाहणे.
स्थायी आदेशानुसार  
3 उप-मुख्य अग्निशमन अधिकारी
  1. मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली व ते आदेश देतील ती कामे करणे.
  2. महत्वाच्या व आणीबाणीच्या प्रसंगी वर्दीवर जाणे.
  3. आगीच्या व इतर आणीबाणींच्या वेळी पोलिस तसेच इतर विभागांशी संपर्क ठेवून आवश्यक ती मदत मिळविणे.
  4. अग्निशमन दल अद्यावत ठेवण्यासाठी नियोजन करणे.
  5. वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.
  6. मुख्य अग्निशमन अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार अग्निशमन दलाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
  7. अग्निशमन दल कार्यालयाचे प्रशासन पहाणे.
  8. अग्निशमन केंद्रामध्ये वार्षिक फायरड्रिलचे आयोजन करणे.
  9. अग्निशमन केंद्रामध्ये क्रिडा स्पर्धा व फायरड्रिल स्पर्धा यांचे आयोजन करणे.
  10. खात्यांतर्गत विभागीय परिक्षांचे आयोजन करणे.
  11. मुख्य अग्निशमन अधिकारी हयांचें गैरहजेरीत त्यांची सर्व जबाबदारी व कर्तव्ये पार पाडणे.
   
4 स्थानक अधिकारी
  1. स्थानक अधिकारी हया नात्याने स्थानकाच्या संपूर्ण प्रशासनाचे नियंत्रण.
  2. स्थानकातील भांडाराचे नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार साधनसामुग्री व इतर साहित्य उपलब्ध ठेवुन ते कायम सुस्थितीत ठेवणे.
  3. हाताखालील अधिकारी व कर्मचा-यांना आगीच्या साधनांची माहिती देवून ते वापरण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण करणे.
  4. हाताखालील व्यक्ती सर्ववेळी कोणत्याही वर्दीवर पुर्ण तयारीनिशी जाण्यास तयार आहेत किंवा नाही, याची वेगवेगळया वेळी चाचणी घेणे व त्याच्या अग्निशमन अधिका-याला लेखी अहवाल देणे.
  5. महिन्यातून एकदा हजेरी संचलन घेवून कर्मचा-यांकडील गणवेश व इतर सरंजाम सुस्थितीत आहे किंवा नाही याचे निरीक्षण करणे.
  6. कर्मचा-यांस त्यांच्या कर्तव्याची निश्चित जाण आहे किंवा नाही यासाठी वारंवार चाचणी घेणे.
  7. आपले हद्दीतील नळखांब सुस्थितीत आहे किंवा नाही याची किमान सहा महिन्यातून एकदा तपासणी करणे व त्याबाबतचा लेखी अहवाल मुख्य अग्निशमन अधिका-यांना देणे.
  8. अग्निशमन केंद्राकडील सर्व नोंद वहया, घटना पुस्तिका, उपस्थिती पट तसेच अग्निशमन केंद्राशी संबंधीत सर्व रजिस्टर्स सुस्थितीत व अद्ययावत ठेवणे.
  9. अग्निशमन केंद्राकडील दळणवळण यंत्रणा अद्ययावत ठेवणे.
  10. या व्यतिरिक्त मुख्य अग्निशमन अधिका-यांनी नेमून दिलेली इतर सर्व कामे करणे.
   
5 उपस्थानक अधिकारी/उप अधिकारी
  1. स्थानक अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व त्यांचे आदेशानुसार काम करणे.
  2. उपस्थानक अधिकारी हा प्रभारी अधिकारी (डयुटी ऑफीसर) असेंल व तो पुढील कामे करण्यास जबाबदार असेल.
  3. कर्मचा-यांची उपस्थिती घेणे.
  4. ताब्यात असलेली वाहने व इतर साहित्य सुस्थितीत आहे याची कामावर हजर होण्याचे प्रत्येकवेळी खात्री करुन घेणे. आवश्यकते-प्रमाणे योग्य ती दुरुस्ती करुन घेणे.
  5. दुस-या अधिका-यास चार्ज दिल्याशिवाय कार्यालय (स्थानक) न सोडणे.
  6. उपस्थित कर्मचा-यांकडून परेड व ड्रिल करुन घेणे.
  7. अग्निशमन व विमोचन, अग्निप्रतिबंधक सुरक्षा, प्राथमिक उपचार या संबंधीच्या कर्मचा-यांच्या ज्ञानाची वेळोवेळी चाचणी घेणे.
  8. वर्दीवर गेल्यावर त्या संबंधीची संपूर्ण कामे करणे व अहवाल तयार करणे.
  9. स्थानक अधिकारी हयांचे गैरहजेरीत त्यांची कामे पाहणे.
  10. प्रत्येक पाळीत किमान दोन वेळा घटना नोंद वही तपासून त्यामध्ये नोंदी योग्य प्रकारे केल्या आहेत किंवा नाही हे तपासणे, नोंदी तपासल्याबद्दल वेळ नोंदवून दिनांकित सही करणे.
  11. अग्निशमन केंद्रातील फायर वाहनांची लॉग बुके प्रत्येक पाळीचा चालक योग्य रित्या भरत आहे किंवा नाही हे तपासणे व त्याबाबतची नोंद घटना वहीत करणे.
  12. वरिष्ठांनी दिलेली अन्य कामें पार पाडणे.
   
6 अग्निशमन प्रणेता /लिडींग फायरमन/प्रमुख अग्निशामक
  1. ज्या स्थानकात त्याला पदस्थापना दिलेली असेल त्याठिकाणी उपलब्ध असणे.
  2. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळणे व हाताखालील कर्मचा-यांकडून सौजन्याने पणे काटेकोर आज्ञापालन करवून काम करुन घेणे.
  3. हाताखालील कामावर असलेल्या व्यक्तींचा पोषाख योग्य आहे हे पाहणे.
  4. अग्निशमन केंद्राच्या व आगीच्या साधनांच्या संबंधातील व सर्व अनुषंगिक कामे करणे.
  5. अग्निशमन केंद्राचे आवार स्वच्छ व सुबक ठेवण्यास तो जबाबदार असेल.
  6. अग्निशमन केंद्रात असलेली साधने, सरंजाम नीट, सुरळीत आणि काम करण्याच्या स्थितीत ठेवण्यास तसेच सेवेच्या कालावधीत कोणत्याही वेळी बोलविल्यावर तत्पर राहण्यास जबाबदार राहील.
  7. स्थानकांत असलेल्या सर्व वस्तुंची सूची ठेवणे व काही हरविल्यास, तूटफूट झाल्यास त्याबाबत डयूटी अधिका-यास विनाविलंब कळविणे.
  8. सर्व वस्तु व सामानांची जमा व वजा यांची नोंद वेळोवळी घेणे व ती नोंद डयुटी अधिका-यास दाखवून सांक्षांकित करुन घेणे.
  9. हजेंरीपट अद्ययावत ठेवून, रजेवर वा हजर असलेल्या व्यक्तींचा दैनंदिन हिशोब त्यात नोंदविणे.
  10. स्थानकाचा ताबा घेतेवेळी वस्तुसूचीचे निरिक्षण करुन सर्व साठा निरीक्षण केल्यावर तो सर्व बरोबर असल्याचे किंवा जशी परिस्थिती असेल त्यानुसार प्रतिवृत्त, डयुटी अधिका-यास त्याच वेळी सादर करणे.
  11. घटनापुस्तिकेत बोलवणे आलेल्या तंतोतंत वेळेची, जागेची आणि मोटार वाहन प्रयाण केलेल्या व परत आलेल्या वेळेची अचूक नोंद करणे, हे काम आग विझविण्याच्या कामावरुन परत आल्यावर करता येईल. तथापि, कामावर असलेल्या व्यक्तीनेही त्याची कच्ची नोंद ठेवली पाहिजे. आणि घटनापुस्तकात नोंदविण्यात येईपर्यत ती नोंद पुसता कामा नये.
  12. आगीच्या जागी काम केल्यानंतर लवकरात लवकर मुख्यालयास कामाची वेळ व त्याच्या ताब्यात असलेल्या पंपाने किंवा कोणत्याही खाजगी साधनाने वापण्यात आलेल्या पाण्याचे परिमाण सादर केले पाहिजे.
  13. वरिष्ठांना सर्व साधनांचा तपशिल देणे.
  14. आगीच्या जागी ज्यांनी काम केले आहे अशी दलाची किंवा इतर व्यक्ती आगीची सुचना देते वेळी वा नंतर जखमी झाली असेल तर तात्काळ वैदयकीय मदतीसाठी रवाना करणे त्याचा अहवाल देणे.
  15. अग्निशमन अधिकारी यांचे सर्वसाधारण आदेशानुसार हाताखालील व्यक्तींना सुचना देणे व त्यांच्याकडुन आगीचे साधनासह कवायत करुन घेणे.
  16. स्थानक अधिका-यांनी वेळोवेळी सोपविलेली विशिष्ठ कामे करणे.
   
06 ड्रायव्हर ऑपरेटर / यंत्रचालक / वाहनचालक
  1. पदस्थापना दिलेली असेल त्या ठिकाणी सर्ववेळ उपलब्ध असणे.
  2. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळण्याकरिता त्यांच्या हाताखाली सेवा करणा-याकडून (जर कोणी असेल तर) काटेकोर आज्ञापालन व सौजन्याने काम करुन घेणे.
  3. सरंजाम आणि गिअर्स किंवा आगीच्या स्थानकावर/वर्दीवर ठेवण्यात येणा-या साधनांची योग्य निगा राखण्याकरिता त्याच्या ताब्यातील वाहनांची व पंपाची योग्य निगा, यांत्रिक सुस्थिती आणि हालचाली करिता तो प्रमुख अग्निशामकासह जबाबदार राहील.
  4. कामावर हजर झाल्यावर त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहनाची साधनांची, ती उपयोगाची आहेत किंवा नाही याची कमीत कमी एकदा चाचणी घेईल. व त्यासाठीच्या रजिस्टरवर नोंद करेल. त्यात आढळणा-या कोणत्याही दोषांबाबत तो प्रमुख अग्निशामकास किंवा डयुटी अधिका-यास तात्काळ अहवाल सादर करील.
  5. त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व वस्तुंची आणि साधनांची तो वस्तुसुची ठेवील आणि त्यात कामाची वेळ प्रवास झाल्यास अंतर (कि.मी. मध्ये), पेट्रोल, डिझेल व तेलाचा वापर इत्यादिंची नोंद करेल. लॉग बुक लिहीण्याची जबाबदारी त्याची असेल.
  6. रोजच्या डयुटीच्या वेळी लिडींग फायरमन घेत असलेल्या कवायतीत भाग घेणे.
  7. स्थानक अधिका-यांनी दिलेली विशिष्ठ कामे पूर्ण करणे.
   
8 फायरमन / अग्निशामक / विमोचक
  1. कार्यरत असलेल्या स्थानकात त्याला ज्या ठिकाणी पदस्थापना दिली असेल त्या ठिकाणी उपलब्ध असणे.
  2. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळण्याकरिता तत्पर असणे.,
  3. वरिष्ठांनी ठरवून दिलेली सर्व कामे कार्यक्षमतेने पार पाडणे.
  4. स्वत: नीटनीटके राहणे आणि जर निवासस्थान पुरविण्यात आले असेल तर ते नीट ठेवणे.
  5. अग्निशमन सेवेतील कामाला अवधानपुर्वक संपुर्ण वेळ वाहुन घेणे.
  6. अग्निशमन केंद्र, आवार, साधने ठेवलेली खोली भांडारगृह, कार्यालय, कवायत आवार, पहारा कक्ष कार्यशाळा, कॉमन रुम (विश्रांती गृह) कवायत मनोरा, होज पाईप चालविण्याचा मनोरा इत्यादि जागा निटनेटकी व स्वच्छ धुवून ठेवण्यास, तसेच साधने, सरंजाम सामुग्री इत्यादि स्वच्छ आणि निटनेटकेपणाने ठेवण्यास जबाबदार असेल.
  7. आगीच्या व इतर वर्दीवर जाण्याकरिता तसेच आगीची कवायत करण्याकरिता इशारा मिळाल्यापासून कमीत कमी वेळेत हजर राहण्यास तो स्वत:ला तत्पर ठेवील.
  8. स्थानकाच्या हद्दीतील आणि जोडुन असलेल्या क्षेत्राची तसेच आगीचा धोका असलेल्या अशा क्षेत्रांची नकाशावरुन माहिती घेईल.
  9. (अ) त्याला वेळोवेळी दिलेली कामे पार पाडण्यास तसेच अग्निशमन केंद्राला पुरविण्यात आलेल्या साधनांची काळजी घेणे, काटेकोरपणे स्वच्छता ठेवणे आणि सर्व साधने बिनचूक टापटीपीने साठवून ठेवणे व त्यांच्या देखभालीकरिता प्रमुख अग्निशामकासह संयुक्तरित्या तो जबाबदार राहील.
    (ब) अग्निशमन दलाला पुरविण्यात आलेल्या वाहनांची स्वच्छता आणि पॉलीश, वाहनांवरील आणि साठवणीतील साधने स्वच्छ करणे व पॉलीश करणे, होज खरखरुन घासणे व धुणे, स्थानकाच्या फरश्या, भिंती, दरवाजे, खिडक्या घासून स्वच्छ करणे, गॅरेज, कवायत मनोरे व बागेची सुव्यवस्था राखणे या कामांचा यात समावेश असेल.
  10. चालक आणि यंत्रचालकांना साधनांची आणि वाहनांच्या गिअर्सच्या योग्य देखभालीकरिता सहाय्य करणे, तसेच रक्षणाची कर्तव्ये, कार्यशाळेची कामे, नियंत्रण कक्ष व पहारा कक्ष येथील कामे, ऑफीस ऑर्डर्लीची कामे व आगीच्या वेळी प्रथमोपचार व संदेशवहन ही कामे करणे.
  11. अग्निशमन केंद्राला पुरविण्यात आलेल्या साधनांची बारकाईने तपासणी करणे व प्रमुख अग्निशामकाला ही साधन सामुग्री तपासल्याबाबतचा अहवाल देणे.
  12. स्थानकाचा प्रभारी त्याला योग्य वाटेल अशा इतर पध्दतीने किंवा पाळीने जेव्हा अग्निशामकाची रक्षक म्हणून नेमणूक करेल त्यावेळी तो पूर्ण गणवेश धारण करील व त्याची जागा घेण्याकरिता दुसरा रक्षक हजर झाल्याशिवाय आपली जागा सोडणार नाही अशा वेळी अग्निशामक खालील कर्तव्यासाठी जबाबदार असेल.
    अ) सदैव दक्ष आणि तत्पर राहणे.
    ब) स्थानक व परिसरातील सर्व मालमत्तेचे रक्षण करणे.
    क) अग्निशमन केंद्रात येणा-या सर्व व्यक्ती प्रभारी अधिका-याकडे जातील आणि काम झाल्यावर केंद्रातून बाहेर पडतील हे पाहणे.
    ड) आत येणा-या व बाहेर जाणा-या वाहनांचा अपघात टाळण्याकरिता नियत्रण ठेवणे.
    ई) स्थानक परिसरातील बाग व झाडांचे रक्षण करणे.
  13. वरील कर्तव्यास जोडून, अग्निशामक, गरजेप्रमाणे व वरिष्ठांकडुन आलेल्या आदेशाप्रमाणे अग्निशमन सेवेच्या अंतर्गत कोणतेही काम करील.
   

CHECK LIST :-

  1. Provisional N.O.C. :-
    1. Application from the Archirect/Developer
    2. Proposed plans (2 Sets, as per N.B.C. with Over Head Tank Capacity (for Fire), Fire Duct, Fire Brigade Inlet, Electric Substation, Underground Water Tank for Fire ( if Required) & Open space measurement)
    3. Commencement Certificate (if Taken)
    4. Sanctioned Plan (if C.C. Taken)
    5. Provisional N.O.C. (if Previous taken)
    6. Built up area certificate
  2. Final N.O.C :-
    1. Application from the Archirect/Developer
    2. Commencement Certificate
    3. Sanctioned Plan
    4. Built up area certificate
    5. Provisional N.O.C. (if taken)
    6. Structure Stability Certificate
    7. Building Completion Certificate
    8. Lift License (P.W.D.)
    9. Fire Fighting System Installation Certificate In Form “A” (from the license Agency of Mira Bhayander Municipal Corporation or Government Of Maharashtra)
  3. Shop/ Small Business  N.O.C :-
    1. Application from the Owner/Occupier
    2. Commencement Certificate
    3. Current Year Property Tax Payment Receipt
    4. Corporation Parwana
    5. Gumasata License
    6. L.B.T. Certificate
    7. Fire Fighting Extinguisher Certificate (from A license Agency of Mira Bhayander Municipal Corporation or Government Of Maharashtra)
  4. Fire Report :-
    1. Application from the Owner
    2. Police Report (Panchanama)
  5. Renewal of Final N.O.C. :- 
    1. Application from the Archirect/Developer/Occupier
    2. Fire Fighting System Installation Certificate In Form “B” (from the license Agency of Mira Bhayander Municipal Corporation or Government Of Maharashtra)

शेवटचा बदल : 03-10-2019