विभाग प्रमुख | श्री. राजकुमार म. घरत |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | 022-28042223/ 022-28192828 Ext. 230 |
ई- मेल | pro@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर (प.) येथील मुख्य कार्यालयात, पहिल्या मजल्यावरजनसंपर्क विभाग कार्यरत आहे. सदरहु विभागामार्फत, महानगरपालिकेच्या प्रशासकीयकामकाजाच्या मुख्य कार्यासंबंधीची माहिती प्रेसनोट द्वारे वेळोवेळी प्रसिध्दकरण्यात येते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्याविभागामार्फत प्राप्त होणाऱ्या विविधविकासकामाच्या जाहीर निविदा सुचनातसेच जाहीर निवेदन शासकीयनियमानुसार वृत्तपत्रात प्रसिध्दकेलेजाते.
कार्याचे स्वरुप
महानगरपालिकेचे विविध विभागातील मुख्य कार्य संबंधीची प्रेस नोट प्रसिध्द करणे. तसेच महानगरपालिकेच्या निरनिराळया विभागातील कामांच्या निविदा सूचना तसेच जाहिर निवेदन वर्तमानपत्रात शासकीय नियमांनुसार प्रसिध्द करणे. त्याचप्रमाणे वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या जाहिर निविदा सूचना अथवा जाहिर निवेदनांचे शासकीय नियमांनुसार देयके प्रदान करण्यांची कार्यवाही करणे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध कामांच्या जाहिर निविदा सूचना तसेच जाहिर निवेदन वर्तमानपत्रांत प्रसिध्द करणेचे कामकाज हे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 469,470 अन्वये तसेच, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. पी.यु.बी.1000/प्र.क्र. 73/2000/34 दि. 1 मे 2001 अन्वये करण्यांत येते.
मिरा भाईंदर महानगरपालिका कवी वि.वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी
आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरा भाईंदर महानगरपालिका नगरभवन येथे तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात मा. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मा. आयुक्त डॉ.विजय राठोड, मा. स्थायी समिती सभापती अशोक तिवारी, मा. सभागृह नेते प्रशांत दळवी, मा. विरोधी पक्ष नेते, प्रविण पाटील, मा. अति. आयुक्त दिलीप ढोले, मा. सभापती, महिलाबालकल्याण, वंदना पाटील, मा. उपसभापती, महिला बाल कल्याण सुनिता पाटील, महापालिकेचे पदाधिकारी व मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मा.महापौर यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या वि.वा.शिरवाडकर यांच्या बद्दल कौतुकास्पद उद्गार काढले व सुंदर कविता करून अभिवादन केले. महापालिकेचे मा. आयुक्त व मा. विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करताना सुंदर कविता करून अभिवादन केले. शेवटी अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार मानले.