विभाग प्रमुख | यशोधरा शिंदे |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | २८०४४९५९ |
ई- मेल | library@mbmc.gov.in |
1. नगरवाचनालय, नगरभवन, दुसरा मजला, मांडली तलाव समोर,भाईंदर (प)
नगरवाचनालयाची स्थापना 13 फेब्रुवारी 1994 रोजी करण्यात आली आहे. सध्या नगरभवन येथील वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 21,565 ग्रंथांचा समावेश आहे. नगरवाचनालयात एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. नगरवाचनालयात संदर्भ विभाग समृध्द असून वाचक वाचनालयात ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इत्यादी नावाजलेल्या संदर्भ ग्रंथांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. या स्पर्धा परिक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. नगरवाचनालयात मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. शहरातील नागरिकांना वाचनालयात दररोज 34 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सोय केलेली आहे.
2. प्र.स.का.क्र.3 वाचनालय, तलाव रोड, भाईंदर (पू).
प्र.स.का.क्र.3 भाईंदर (पु.) येथील ईमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. प्र.स.का.क्र. 3 वाचनालयात मराठी भाषेतील 6451 ग्रंथ आहेत. तसेच प्र.स.का.क्र.3, तलाव रोड येथे एकूण 37 नियतकालिके (20 मासिके, 7 पाक्षिके, 10 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 73 ते 100 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. दररोज 13 वृत्तपत्रांची मोफत वाचनांची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
3.राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पू).
राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.) येथे तळमजल्यावर वाचनालय व दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी व इंग्रजी भाषेतील 20,000 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील ठिकाण 30 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
4. हनुमान नगर वाचनालय, भाईदर (पू).
हनुमान नगर वाचनालय, भाईदर (पू.) येथे तळमजल्यावर वाचनालय व पहील्या मजल्यावर अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी भाषेतील 5,200 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच वरील ठिकाणी 06 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
5. आरक्षण क्र.100, फ्लायओव्हर जवळ, भाईंदर (प)
आरक्षण क्र.100, फ्लायओव्हर जवळ, भाईंदर (प.) येथील ईमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर विदयार्थ्यांकरीता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
6. जरीमरी तलाव अभ्यासिका, साई कॉम्पलेक्स जवळ, काशिमिरा, मिरा रोड (पु.)
जरीमरी तलाव अभ्यासिका, साई कॉम्पलेक्स जवळ, काशिमिरा, मिरा रोड (पु.) येथे तळमजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
7. कै. विलासराव देशमुख भवन अभ्यासिका,जांगीड ॲमिनीटी हॉल, कनकीया, मिरा रोड (पु.)
जांगीड ॲमिनीटी हॉल, कनकीया, मिरा रोड (पु.) येथील ईमारतीमधील अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
8. आ. क्र. 318, सिल्व्हर सरीता अभ्यासिका, काशिगाव, मिरा रोड (पु.)
आ.क्र.318, सिल्व्हर सरीता, काशिगाव, मिरा रोड (पु .) येथील ईमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा व नाममात्र फी आकारुन इंटरनेव्दारे शैक्षणिक संकेतस्थळे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
9. सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.)
सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.) ईमारतीमधील तळमजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
10. ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पुनम गार्डन, मिरा रोड (पू.)
ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पुनम गार्डन, मिरा रोड (पू.) ईमारतीमधील पहिल्या मजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ग्रंथालयीन सेवा :
- अभ्यासिका : नगरवाचनालय, राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय मिरारोड, प्रभाग स.का.क्र.3 भाईंदर (पू.), हनुमाननगर भाईंदर (पू.), आरक्षण 100 भाईंदर (प.), जरीमरी तलाव अभ्यासिका, कै. विलासराव देशमुख भवन अभ्यासिका मिरा रोड (पु.), आ.क्र.318, सिल्व्हर सरीता अभ्यासिका काशिगाव, मिरा रोड (पु.),सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.) व ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पुनम गार्डन, मिरा रोड (पू.) येथे अद्यावत अभ्यासिका असुन परिसरातले बरेचसे विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.
- संदर्भ सेवा : नगरवाचनालय, राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय मिरारोड, प्रभाग स.का.क्र.3 भाईंदर (पू.) हनुमाननगर भाईंदर (पू.),येथील ग्रंथलयात विश्वकोश, ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इ. बरेचसे संदर्भग्रंथ असुन परिसरातील बरेचसे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.
- मोफत वृत्तपत्र वाचन सेवा : नगरवाचनालय भाईंदर (प.), राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय मिरारोड, प्रभाग स.का.क्र.3 भाईंदर (पू.) हनुमाननगर भाईंदर (पू.) येथे मिरा-भाईंदर मधील नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्रे वाचनकक्ष असुन बरेचसे नागरीक त्याचा लाभ घेतात.
- पुस्तके देवाण-घेवाण सेवा : वाचनालयांमार्फत वाचकांना चांगले ग्रंथ घरी वाचावयास दिले जातात.
अधिकारी / कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये
अ.क्र. | पदनाम | कायदेशीर तरतुद | जबाबदारी व कर्तव्ये |
---|---|---|---|
1) | उपायुक्त | सर्व वाचनालये, अभ्यासिका यांचे व्यवस्थापन करणे. | |
2) | सहा. आयुक्त | सर्व वाचनालये, अभ्यासिकांचे व्यवस्थापन करण्यासंबंधी प्रस्ताव सादर करणे. | |
3) | ग्रंथपाल |
|
|
4) | लिपिक (1) |
|
|
5) | लिपिक (2) |
|
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे ग्रंथालये
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 वाचनालय व अभ्यासिका
राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका
हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यरत अभ्यासिकांचा तपशील
अ.क्र. | अभ्यासिकांची नावे व पत्ता | विदयार्र्थी बसण्याची क्षमता | ||
---|---|---|---|---|
मुले | मुली | एकुण | ||
01. | नगरवाचनालय अभ्यासिका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा व तिसरा मजला. मांडली तलावजवळ, भाईंदर (प.) | 99 | 51 | 150 |
02. | राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, तळमजला व दुसरा मजला, मिरारोड (पु.) | 126 | 84 | 210 |
03. | प्रभाग समिती कार्यालयक्रं 3 वाचनालय अभ्यासिका दुसरा मजला व तिसरा मजला, तलावरोड, भाईंदर (प.) | 85 | 54 | 139 |
04. | हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका, तळमजला व पहीला मजला, हनुमान नगर.भाईंदर(पु.) | --- | --- | 18 |
05. | आरक्षणक्र.100 अभ्यासिका, पहिला मजला व दुसरा मजला, विरंगुळाकेद्र, भाईंदर (प.) | 48 | 24 | 72 |
06. | अभ्यासिका, जरीमरी तलाव लगत ईमारत, साईकॉम्पलेक्स जवळ, काशिमिरा | 10 | 12 | 22 |
07. | कै.विलासराव देशमुख भवन जांगीड ॲमिनीटी हॉल, दुसऱ्या मजला अभ्यासिका मिरारोड (पू.) | 35 | 10 | 45 |
08. | आ.क्र.318 सिल्व्हर सरीता,दुसरा मजला अभ्यासिका, काशीगाव | 50 | 50 | 100 |
09. | सावित्रीबाई फुले अभ्यासिका, पहिल्या मजला यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू) | 30 | 30 | 60 |
10. | ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पहिल्या मजला पुनम गार्डन, मिरा रोड (पू.) | 86 | 21 | 107 |
वाचनालय/ अभ्यासिकांचे सभासद होणेसंबधी माहिती
मिरा-भाईंदर परिसरातील लहान थोर नागरिकांस खालील प्रमाणे वर्गणी भरुन वरील सर्व वाचनालय/अभ्यासिकांचे सभासद होता येते.
वाचनालय सभासद वर्गणी :
- वाचनालय अनामत – रु. ३००/-
- नोंदणी फी – रु. २०/-
- फॉर्म फी – रु. ५/-
- मासिक फी – रु. २०/- प्रति माह
- एकुण – ३४५/-
अभ्यासिका सदस्य वर्गणी :
- फॉर्म फी – रु. ५/-
- अभ्यासिका फी (लॉकरविरहित) – रु. १२० /- (वार्षिक)
- अभ्यासिका फी (लॉकरसहीत) १८०/-(वार्षिक)
- मिरा-भाईंदर परिसरातील रहिवासी असल्याबाबतचा पुरावा. (उदा. आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची झेरॉक्स प्रत)
- परीक्षेचा पुरावा. (उदा. शाळा/महाविदयालयाचे ओळखपत्र, परीक्षेचे ओळखपत्र, परीक्षा फी ची पावती, परीक्षेचा अर्ज किंवा नोंदणी पत्र यापैकी कोणत्याही एकाची झेरॉक्स प्रत)
- दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो.
REQUIRED DOCUMENTS FOR STUDYROOM ADMISSION
- RESIDENTIAL PROOF OF MIRA BHAYANDAR CITY & PHOTO IDENTITYPROOF
( ZEROX COPY OF AADHAR CARD/RATION CARD/DRIVING LICENCE/BANK PASS BOOK/ SOCIETY NOC/ELECTION CARD/ PASSPORT/ OWNERSHIP & RENT AGREEMENT )
NOTE :- EITHER ONE OF THEM - EXAMINATION PROOF
( ZEROX COPY OF EXAMINATION HALL TICKET, SCHOOL / COLLEGE ID, EXAMINATION FEES RECEIPT, EXAMINATION FORM EXAMINATION REGISTRATION LETTER.)
NOTE :- EITHER ONE OF THEM - TWO SAME COLOUR PHOTOS ( PASSPORT SIZE )
- TIMING OF ADMISSION : TUESDAY TO SATURDAY :- 09.45 AM TO 1.15 PM & 2.00 PM TO 3.30 PM
- HOLIDAYS : EVERY SATURDAY, SUNDAY AND GOVERMENT HOLIDAYS LIBRARY REMAIN CLOSE
NOTE - NO ADDMISSION FOR STUDYROOM ON EVERY SATURDAY, SUNDAY AND GOVERMENT HOLIDAYS
वाचनालयाकरीता सुचना
- वाचनाची आवड असणाऱ्या कोणत्याही लहान थोर व्याक्तिस कोणत्याही महीन्यापासुन वाचनालयाचे सभासद होता येईल.
- सभासद फी खालीलप्रमाणे राहील
- वाचनालय अनामत रु. 300/-
- फॉर्म फी – रु. 5/-
- मासिक फी रु. 20/-
- सभासद नोदंणी फी रु. 20/-
- वाचनालयाकडुन प्रत्येक सभासदास ओळखपत्र मोफत दिले जाईल. नवीन ओळखपत्रासाठी रु. 2/- फी आकारण्यात येईल.
- एका वेळी एकच पुस्तक पंधरा दिवसांच्या मुदतीन देण्यात येईल. पुस्तक परतीची तारीख सभासदांच्या आठवणीसाठी शेवटी चिटकवलेल्या स्लीपवर तारखेचा शिक्का मारुन निर्देश केला जाईल.
- नावावर घेतलेले पुस्तक अत्यंत काळजीपुर्वक वापरावे.
- पुस्तक फाटल्यास अन्य कारणांनी खराब केल्यास अथवा हरविल्यास पुस्तकांची पुर्ण किंमत व अधिक रु. 10/- दंड भरावा लागेल.
- वाचनालयातील संदर्भ विभाग अतिशय समृध्द आहे. या विभागातील कोणत्याही सबबीवर बाहेर दीले जाणार नाही. वाचकांना त्याचा उपयोग फक्त वाचनालयात करणेचा आहे.
- वाचनालयात पुर्ण शांतता हवी असते. मोठयाने बोलणे,पाय वाजविणे, धुम्रपान करणे यास मनाई आहे.
- वाचनालयाच्या नियमाचे उल्लंघन केल्यास सभासदत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. वाचनालय तुमच्यासाठी आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा सभासदांची घ्यावा ही अपेक्षा.वरील नियमाशिवाय महानगरपालिकेने वेळोवेळी केलेले नियम सभासदांवर बंधनकारक राहतील.
- अभ्यासिकेत प्रवेश करताना आपले ओळखपत्र सुरक्षा रक्षकास दाखविणे बंधनकारक आहे.
- वैध ओळखपत्राशिवाय अभ्यासिकेत प्रवेश करणेस मनाई राहिल.
- अभ्यासिकेत प्रवेश करताना तसेच बाहेर जाताना अभ्यासिका नोंद वहीमध्ये आपले नाव, दिनांक, येण्याची व जाण्याची वेळ लिहून सही करणे बंधनकारक राहिल.
- अभ्यासिकेत मोबाईल, लॅपटॉप/ टॅबलेट पी. सी. वापरणे निषिध्द आहे. (कृपया आपला मोबाईल फोन अभ्यासिकेत प्रवेश केल्यावर बंद करावा अथवा सायलेंट मोडमध्ये ठेवावा.)
- तुमच्या सामानाची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहिल, सामान हरविल्यास किंवा खराब झाल्यास मि.भा.मनपा जबाबदार नसेल.
- अभ्यासिकेतील टेबल व खुर्च्या कोणत्याही सबबीखाली आरक्षीत करता/ ठेवता येणार नाहीत.
- अभ्यासिकेत असताना खालील बाबी करणेस मनाई राहिल.
- मित्रांबरोबर चर्चा करणेस / सामुहीक चर्चा करणे.
- जोरात बोलणे.
- खुर्च्यांचा आवाज करणे.
- टेबलावर / भिंतीवर लिहिणे.
- कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाणे अथवा चघळणे.
- टेबल/खुर्च्यांवर पाय ठेवून बसणेस अथवा झोपण्यास.
- अभ्यासिकेत इअर फोनद्वारे संगीत एैकणे.
- अभ्यासिकेत येताना योग्य पेहराव करणे बंधनकारक राहिल.हाफ पॅन्ट, 3/4 पॅन्ट घालणेस मनाई राहिल.
- शांतता राखणे.
- अभ्यासिकेत स्वच्छता राखावी.
अभ्यासिकेत नोंदणी करणेसाठी विद्यार्थ्यांनी दोन रंगीत पासपोर्ट साईजचे फोटो, मिरा-भाईंदर परिसरातील रहिवासी असल्याबाबतचा पुरावा व ते देत असलेल्या परीक्षेचा पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहिल.
टिप :- जे कोणी विद्यार्थी सदर सुचनांचे उल्लघंन करतील त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.
ग्रंथालयाची वेळ
ग्रंथालयाची वेळ | सोमवार ते शुक्रवार | सकाळी 09.45 ते संध्या. 6.15 |
अभ्यासिकेसाठी वेळ | सर्व दिवस | सकाळी 7.00 ते रात्रौ 11.00 |
सभासदत्व नोंदणीची वेळ | सोमवार ते शुक्रवार | सकाळी 09.45 ते दु. 3.30 |
टिप :- दर शनिवार व रविवार व् शासकीय सुटटीच्या दिवशी वाचनालय बंद राहिल.
माहिती अधिकार अधिनियम
संकेतस्थळ प्रसिद्धिबाबत 17 मुद्द्याची महिती
संकेतस्थळ वचनालयाची महिती अपडेट