मिरा भाईंदर महानगरपालिका
सार्वजनिक आरोग्य विभाग

विभाग प्रमुख अजित मुठे
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 7738314777
ई- मेल health@mbmc.gov.in

मिरा भाईंदर महानगरपालिका दैनंदिन दररोज निर्माण होणारा घनकचरा प्रभाग समिती निहाय साफसफाई करणाऱ्या कंत्राटी वाहनामार्फत घरोघरी जाऊन थेट पध्दतीने गोळा करून मौजे उत्तन येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी वाहनामार्फत वाहतुक करण्यात येत आहे. परिणामी शहरात कुठेही कचऱ्याचे ढिग दिसून येत नाहीत.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन शहरातील सोसायटी/गृहनिर्माण संस्था, शाळा/महाविद्यालये, हॉटेल्स यांना “तारांकित मानांकन” (*******) देण्याचे ठरविले आहे. यासंबंधीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले असून मा. मुख्यमंत्री यांनी नाविन्यपुर्ण उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणी सुरु आहे. या अभियान अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात दि.31/3/2017 पर्यंत हागणदारी मुक्त करण्यात येणार आहे.

सदर अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणे कामी नागरीकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र एकुण 1139 अर्जापैकी 874 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे.

वैयक्तीक शौचालय बांधकाम करणे कामी केंद्र सरकारकडून रु. 4000/-, महाराष्ट्र शासनाकडून रु.8000/- 14वा वित्त आयोगाकडून रु. 5000 व महानगरपालिकेकडून रु.5000/- असे एकुण रु.22000/- प्रती लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेने राष्ट्रीय हरित लवाद पुणे मा. उच्च न्यायालय मु्ंबई यांच्या आदेशानुसार आय.आय.टी. मुंबई यांची घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता तांत्रिक सल्लागार म्हणुन नेमणुक केलेली आहे. आय.आय.टी. मुंबई यांच्याकडुन प्राप्त प्रस्तावानुसार महानगरपालिकेने दि.06/7/2016 रोजी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता निविदा प्रसिध्दी केली. यास प्रतिसाद न मिळाल्याने दि. 03/8/2016 रोजी द्वितीय मुदतवाढ देण्यात आली होती. सदर निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने दि. 22/9/2016 रोजी पुन:श्च निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका व वसई विरार शहर महानगरपालिका संयुक्तपणे मौजे गोखीवरे येथे कच­यापासून विज निर्मिती प्रकल्प उभारणीची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी दोन्ही महानगरपालिकेने मा. महासभेचा ठराव करून सहमती दिलेली आहे.

विभागाची कामे :-

  1. शहरातील सार्वजनीक रस्ते, पदपथ व जागा यांचे झाडलोट व साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.
  2. शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर, येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक वाहनामार्फत करणे व घनकचरा प्रक्रिया ठिकाणी टाकण्यात येतो.
  3. अंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.
  4. पावसाळयापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई व अडथळे दुरु करून पावसाळी पाणी व सांडपाणी प्रवाहीत करणे.
  5. पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे.
  6. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणेबाबत कारवाई करणे.
  7. 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.
  8. स्वच्छ भारत अभियान राबविणे.

विभागातील सदस्यांची यादी (नाव, पद, संपर्क)

अ.क्र. अधिकाऱ्याचे वा कर्मचाऱ्याचे नांव पदनाम दुरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल
1 डॉ. संभाजी पानपट्टे उप-आयुकत 7738314777
2 श्री. राजकुमार कांबळे सहा.सार्व. आरोग्य अधिकारी 8422811299
3 श्री. संदीप शिंदे मुख्य आरोग्य निरिक्षक 8422811291
4 श्री. निळकंठ उदावंत स्वच्छता निरिक्षक 8422811285
5 श्री. विजय पाटील स्वच्छता निरिक्षक 8422811296
6 श्री. अरविंद चाळके स्वच्छता निरिक्षक 8422811287
7 श्री. प्रकाश पवार स्वच्छता निरिक्षक 8422811286
8 श्री. नितीन खैरे स्वच्छता निरिक्षक 8422811289
9 श्री. कांतीलाल बांगर स्वच्छता निरिक्षक 8422811288
10 श्री. अभय सोनावणे स्वच्छता निरिक्षक 8422811277
11 श्री. अनिल राठोड स्वच्छता निरिक्षक 8422811295
12 श्री. रविंद्र पाटील प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811297
13 श्री. मोहन पेडवी प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811298
14 श्री. श्याम चौगुले प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811290
15 श्री. श्रीकांत पराडकर प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811292
16 श्री. रमेश घरत प्र. स्वच्छता निरिक्षक 8422811266

उपक्रम / योजना :-

  • स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन शहरातील सोसायटी/गृहनिर्माण संस्था, शाळा/महाविद्यालये, हॉटेल्स यांना “तारांकित मानांकन” (*******) देण्याचे ठरविले आहे.
  • ओला कचरा व सुका कचरा वेगवगेळया डब्ब्यात जमा करून महानगरपालिकेस देणे.

नागरिकांची सनद :-

अ.क्र. सेवांचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव व हुद्दा आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
1 उघडी गटारे तुंबून व भरून वाहणेबाबत सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक एक दिवस मा. उप-आयुक्त (आरोग्य)
2 रस्ते सफाई / कचरा वाहतुक सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक सोमवार ते शनिवार वेळ सकाळी 7.00 ते 3.00 मा. उप-आयुक्त (आरोग्य)
3 कचरा कुंडीतील कचरा, रॅबिट /माल हलविणे सहा.सार्व.आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व संबंधित स्वच्छता निरिक्षक 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)
4 गटारातील साचवलेला गाळ काढणे संबंधित स्वच्छता निरिक्षक तक्रार आल्यास 24 तासाचे आत साप्ताहीक कार्यक्रम राबविण्यात येतो. मा. उप-आयुक्त (आरोग्य)
5 रस्त्यावरील कचरा /माती उचलणेसाठी संबंधित मालकांना नोटीस देणे संबंधित स्वच्छता निरिक्षक 48 तसाचे आत मा. उप-आयुक्त (आरोग्य)
6 संबंधित मालकाने रॅबिट/ माती महानगरपालिकेच्या सफाई कामगारामार्फत उचलणे संबंधित स्वच्छता निरिक्षक नोटीस, मुदतीनंतर 9 दिवसाचे आत संबंधित रक्कम मालकाकडून वसूल करण्यात येईल. मा. उप-आयुक्त (आरोग्य)
7 मृत जनावरांची विल्हेवाट लावणे संबंधित स्वच्छता निरिक्षक 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)
8 सार्व. शौचालये व खाजगी इमारतीचे सेप्टीक टँक सफाई करणे लिपिक, मुख्य कार्यालय, आरोग्य विभाग फी भरल्यानंतर 24 तासात मा. उप-आयुक्त (आरोग्य)
9 किटक नाशके/ औषध फवारणी मुकादम/ स्वच्छता निरिक्षक आठवडयातून एक दिवस मा. उप-आयुक्त (आरोग्य)
10 गटारामधील गाळ काढणे स्वच्छता निरिक्षक आठवडयातू एकदा मा. उप-आयुक्त (आरोग्य)
11 संबंधित मालकाने राडारोडा न उचलेस मनपाने उचलणे मुकादम/ स्वच्छता निरिक्षक नोटीस मुदती नंतर सुमारे सात दिवसाचे आत संबंधित मालकाकडून दंड रक्कम वसूल करणे मा. उप-आयुक्त (आरोग्य)

Enviroment Status Report 2016-017

MPCB.2018-19

पर्यावरण अहवाल 2018 - 2019


शेवटचा बदल : 17-09-2021