मिरा भाईंदर महानगरपालिका
भांडार विभाग

सहा.आयुक्त (भांडार) श्री. सुनिल यादव
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422811507
ई- मेल mbmcstore@gmail.com / store@mbmc.gov.in

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागास स्टेशनरी खरेदी, विविध प्रकारची नमुने, फॉर्म, रजिस्टर छपाई करणे, फर्निचर खरेदी, दुरुस्ती, बोर्ड-बॅनर पुरविणे, वृत्तपत्रे खरेदी, ओळखपत्र छपाई, आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना पावसाळी साहित्य (छत्र्या, रेनकोट, गमबूट) तसेच गणवेश पुरवठा करणे व इतर कामकाज भांडार विभागामार्फत करण्यात येते.

विभागाची कामे

अ.क्र. पदनाम जबाबदारी व कर्तव्ये
उप-आयुक्त (भांडार) १. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भांडार विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून सर्व जबाबदा-या पार पाडणे.
२. भांडार विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
३. रक्कम रु.२ लाखा पेक्षा कमी रक्कमेच्या कामास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देणे व निविदा मागविणे, निविदा मंजुर करणे, मुदत वाढ देणे.
४. मंजुर निविदाधारकांसोबत करारनामा करणे, कार्यादेश देणे.
५. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये भांडार विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे.
सहा.आयुक्त (भांडार) १. महानगरपालिकेच्या विविध विभागास लागणारे स्टेशनरी साहित्य, विविध प्रकारचे नमुने, बोर्ड-बॅनर बनविणे, फ़र्निचर खरेदी करणे, कर्मचा-यांना दर २ वर्षांनी छ्त्र्या, रेनकोट, गणवेष पुरवठा करणे कामी निविदा प्रकिया करणेसाठी प्रस्ताव सादर करणे, मंजुर निविदाधारकांस मागणीनुसार कामाचे कार्यादेश देण्याची कार्यवाही करणे.
२. महापालिकेचे पदाधिकारी, जनसंपर्क विभाग, पत्रकार कक्ष, ज्येष्ठ 2. नागरीक विरंगुळा केंद्र येथे वृत्तपत्र पुरवठा करणे.
३. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये भांडार विभागाचे जनमाहिती अधिकरी म्हणून कामकाज करणे.
वरिष्ठ लिपीक १. आवक-जावक पत्रव्यवहारची नोंद घेणे.
२. निविदा प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही करणे.
३. कंत्राटदाराने पुरवठा केलेल्या साहित्यांची नोंद स्टॉक रजिस्टरला घेणे. व सदरचे साहित्य संबंधीत विभागास वितरीत करुन त्याची नोंद घेणे.
४. पुरवठा केलेल्या मालाचे देयक तयार करणे.
५. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये भांडार विभागाचे सहाय्यक जनमाहिती अधिकरी म्हणून कामकाज करणे.

माहिती अधिकार अधिनियम २००५

१. श्री. जगदिश भोपतराव, भांडार अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी

२. श्रीम. माधुरी घेगडमल, वरिष्ठ लिपीक तथा सहा. जनमाहिती अधिकारी

३. श्री. संभाजी वाघमारे, उप-आयुक्त (भांडार) तथा प्रथम अपिलीय अधिकारी

अनुक्रम

१. उप-आयुक्त (भांडार)

२. सहा.आयुक्त (भांडार)

३. वरिष्ठ लिपीक

४. स.का./ मजुर / रखवालदार

विभागातील अधिकारी / कर्मचारी यादी

१. श्री. संभाजी वाघमारे, उप-आयुक्त (भांडार)

२. श्री. जगदिश भोपतराव, सहा.आयुक्त (भांडार)

३. श्रीम. माधुरी घेगडमल, वरिष्ठ लिपीक

४. श्री. सुनिल रॉड्रीक्स, मजुर (अपंग)

५. श्री. राजवेल मोटीयन, स.का.

६. श्री. सुनिल राठोड, रखवालदार

निविदा

भांडार विभागामार्फत मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागास स्टेशनरी खरेदी, विविध प्रकारची नमुने, फॉर्म, रजिस्टर छपाई करणे, फर्निचर खरेदी, दुरुस्ती, बोर्ड-बॅनर पुरविणे, वृत्तपत्रे खरेदी, आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना पावसाळी साहित्य (छत्र्या, रेनकोट, गमबूट) तसेच गणवेश पुरवठा करणे कामाच्या निविदा मागवून ठेकेदार नियुक्त केला जातो. सदर ठेकेदारामार्फत विविध विभागांच्या मागणीनुसार साहित्यांचा पुरवठा केला जातो.

नेमणूक/बदली

श्री. जगदिश भोपतराव यांची बदली दि. 31/08/2019 रोजीच्या आदेशान्वये भांडार अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

कामाचे आदेश

१. महानगरपालिकेस विविध प्रकारचे बोर्ड-बॅनर, होर्डिग्ज, नेमप्लेट छपाई करणेकामी मे. श्री. ए.डी. इंटरप्रायजेस, मे. सह्योगिनी वस्तीस्तर संस्था, मे. ओमकार इंटरप्रायजेस यांच्या निविदा मा. आयुक्त साो. यांनी दि. 23/03/2020 रोजी मंजुर केलेल्या आहेत.

२. महानगरपालिकेस विविध प्रकारची स्टेशनरी साहित्य पुरवठा करणेकामी Gem पोर्टलवर निविदा प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

३. महानगरपालिकेस विविध प्रकारचे नमुने,फॉर्म, रजिस्टर छपाई करणेकामी Online ई-टेडरिंगव्दारे निविदा प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

सार्वजनिक प्राधिकरणामध्ये स्वत:हून किंवा सकारात्मक तत्वावर माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 अन्वये माहिती प्रकट करण्याबाबत. (भांडार विभाग) (17 मुद्दे)

भांडार विभागातील नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांचेकडे सोपविण्यात आलेली कर्तव्य व कामकाज याबाबतची माहिती (JOB CHART)

 


शेवटचा बदल : 09-08-2021