विभाग प्रमुख | श्री. हेंमत ठाकुर, सहा.संचालक |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | 9967837578, 022-28108165/28121455 |
ई- मेल | tp@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर शहराचे क्षेत्र ७९.४० चौ. कि.मी. असून १९ महसुली गावांचा समावेश आहे.मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) दि.१४/०५/१९९७ रोजी मंजूर झालेली असून दि.१५/०७/१९९७ पासून अंमलात आलेले आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना दि.२५/०८/२००० रोजी मंजूर झालेली असून दि.१५/१०/२००० पासून अंमलात आलेली आहे. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीएस-१२०८/१३४६/प्र.क्र.२६७/०८/नवि-१२, दि.२९/०८/२००९ अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत.
नगररचना विभागामध्ये २३ कर्मचारी असून तांत्रिकपदे ०९ व अतांत्रिकपदे ०५ आहेत. सध्या कार्यरत नगररचनाकार - ०१, प्र. सहा. नगररचनाकार - ०१, कनिष्ठ अभियंता - ०४, मुख्य सर्व्हेअर , सर्व्हेअर , अनुरेखन प्रत्येकी ०१ व वरिष्ठ लिपिक / लिपिक - ०५ आहेत.
टिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली फाईल डाऊनलोड करा.
काम काजाचे स्वरूप
- नवीन / सुधारित/ पुर्न:विकास बांधकाम प्रस्ताव छाननी
- जोत्याचा दाखला,
- भोगवटा दाखला छाननी
- विकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ताब्यात घेणे.
- विकास योजनेतील आरक्षणाखाली जागा, भुसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.
- महानगरपालिका विभागातील जागेचा झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जमीन मोजणी साठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, विकास योजनेबाबत अभिप्राय देणे.
- महानगरपालिका क्षेत्रातील जुने गाळे / निवासी इमारत, औद्योगिक गाळे इत्यादी सुस्थितीत करणेसाठी दुरुस्ती परवानगी देणे.
- जागेवर कुंपणभिंत लावणेसाठी परवानगी देणे.
- निवासी इमारतीवर पावसाळा कालावधीसाठी वेदरशेड परवानगी देणे.
- शासकीय जागा मागणी प्रस्ताव तयार करणे.
- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार करावयाची इतर विविध कामे.
- मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार करावयाची विविध कामे.
- महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग अधिकारी यांना बांधकामाची माहिती / तपशील देणे व मार्गदर्शन करणे.
- न्यायालयीन प्रकरणात विधी विभागास माहिती पुरविणे व आवश्यक असलेल्या न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करणे.
- मा. स्थायी समिती, मा. महासभा, इत्यादी विषय निहाय गोषवारा तयार करणे व त्या अनुषंगाने पुढील कामे करणे.
- माहिती अधिकार, अपिलीय अधिकारातील कामे.
- महानगरपालिकेतील इतर विभागातील आलेल्या संदर्भावर अभिप्राय देणे.
- मा. आयुक्त सो. यांनी निर्देशीत केलेले इतर कामे.

मान्यताप्राप्त बांधकाम
सन 2021-22 - बांधकाम परवानगी तपशील
मिरा भाईंदर शहराच्या मंजूर विकास योजनामध्ये फेरबदल करणेबाबत
नगररचना विभागाची माहिती वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत. 2021
Z(2)-D.R.C.(Final-2021) - हस्तांतरणीय विकासहक्काद्वारे संपादन केलेल्या आरक्षणाची माहिती















थकबाकीदार विकासकांची यादी
अनधिकृत रचना नियमितकरण
माहिती अधिकार अधिनियम
31 जानेवारी 2021 पर्यंत ताब्यात आलेल्या आरक्षणाची माहिती.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वयेच्या फेरबदलाची माहिती.
मीरा भाईंदर संकेतस्थळाबाबत
प्राथमिक परवानगी
महालेखपाल यांचेकडील लेखापरीक्षण अहवाल वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत