विभाग प्रमुख | श्री. सचिन बच्छाव |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ९५९९५१३२२२ |
ई- मेल | mbmcvehicle@gmail.com |
मिरा भाईंदर महानगरपालिकेची एकुण 68 वाहने आहेत. सदर वाहनामध्ये कार, टेम्पो, ट्रॅक्टर, मोबाईल जीप, महिंद्रा मॅक्सीमो, रुग्णवाहिका , शववाहिनी, तसेच अग्निशमन सेवेत रेस्क्यु व्हॅन, वॉटर टेंडर, टँकर इ. वाहने सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग, पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत.
सदर वाहनाची आवश्यकते नुसार दरपत्रके प्रसिध्दी देऊन दुरुस्ती केली जाते.
महापालिकेकडे असलेली वाहने पदाधिकारी व अधिकारी यांच्या तुलनेत अपुरी असल्याने वाहन विभागामार्फत वाहने वाहन चालकासह इंधनासह(संपूर्ण सेवा) भाडयाने घेणे कामी वार्षिक निविदा मंजुर करुन ठेका वाहने पुरवठा करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेत अग्निशमन विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागात 2 ते 3 पाळी मध्ये वाहने कार्यरत असल्याने महापालिकेकडे असलेले कायम वाहन चालकांची संख्या अपुरी असल्याने मनपाच्या विविध विभागातील वाहनांवर ठेका पध्दतीने वाहन चालक पुरवठा करणे वार्षिक निविदा प्रसिध्द करुन निविदेतील मंजुर दरानुसार किमान वेतनानुसार ठेका वाहन चालक पुरवठा करण्यात येतो.मिरा भाईंदर महापालिकेचे जे पदाधिकारी व अधिकारी मनपाच्या कार्यालयीन कामकाजा करीता महापालिकेच्या वाहना ऐवजी स्वत:चे वाहन वापरतात अशा पदाधिकारी व अधिका-यांना मा. स्थायी समितीच्या ठरावा नुसार वाहन प्रतिपुर्ती भत्ता अदा केला जातो.
विभागाची कामे
- महानगरपालिकेच्या विविध वाहनांवर देखरेख ठेवुन वाहनांचे नियोजन करणे, वाहनांमध्े वेळोवेळी उत्पन्न होणारी दुरुस्ती करणे, इंधन पुरवठा करणे, पदाधिकारी/ अधिकारी यांना वाहन भत्ता अदा करणे, तसेच विभागाच्या मागणीनुसार मा. आयुक्त साो. यांच्या मान्यतेने निविदेतील मंजुर दरानुसार ठेका वाहन पुरवठा करणे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागात अत्यावश्यक सेवा, आपतकालीन परिस्थितीत ठेका पध्दतीने वाहने व ठेका वाहनचालक पुरवठा करणे इ.
- विभाग प्रमुख (वाहन) यांनी जन माहिती अधिकारी म्हणुन अर्जदारांस माहिती देणे.
विभागातील सदस्यांची यादी
अ . क्रं | नाव | पद |
---|---|---|
1 | डॉ. संभाजी पानपट्टे | उप-आयुक्त (वाहन) |
2 | श्री.नरेंद्र पाटील | विभाग प्रमुख (वाहन) |
3 | श्री.महेंद्र गावंड | लिपीक |
4 | श्री.रोहित पाटील | शिपाई |
अंदाजपत्रक / कार्यादेश
- अस्थायी आस्थापना ठेका वाहनचालक सर्व विभाग - तरतुद 135.00 लक्ष
- सामान्य प्रशासन पेट्रोल इंधन वाहन दुरुस्ती - तरतुद 45.00 लक्ष
- अग्नीशमन पेट्रोल इंधन वाहन दुरुस्ती - तरतुद 30.00 लक्ष
- आरोग्य पेट्रोल इंधन वाहन दुरुस्ती - तरतुद 10.00 लक्ष
- रुग्णलये/दवाखाने पेट्रोल इंधन वाहन दुरुस्ती - तरतुद 20.00 लक्ष
- खाजगी गाडया भाडयाने घेणे - तरतुद 125.00 लक्ष
- पदाधिकारी/ अधिकारी वाहन प्रतिपुर्ती भत्ता - तरतुद 135.00 लक्ष
- वाहन विमा रक्कम - तरतुद 15.00 लक्ष
घेतलेली कंत्राटे
- वाहने वाहन चालकासह इंधनासह (संपुर्ण सेवा) भाडयाने घेणे.
- महापालिकेच्या विविध विभागात ठेका पध्दतीने वाहन चालक पुरवठा करणे.
हाती घेतलेली कामे
- वाहने वाहन चालकासह इंधनासह (संपुर्ण सेवा) भाडयाने घेणे.
- महापालिकेच्या विविध विभागात ठेका पध्दतीने वाहन चालक पुरवठा करणे.
मिरा भाईंदर महानगरपालिका संकेतस्थळावर निविदा सूचना प्रसिद्ध करणेबाबत